Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – कथेची ओळख

रत्नागिरीच्या समुद्रकिनारी छानस टुमदार घर. घरासमोर व्हरांड्यात एक मोठा बंगाई झुला, समोर मोठ अंगण, तुळशीवृंदावण. समुद्राकडून येणारी गार हवा. सर्व मोकळं आणि कसलाही ताण नसलेलं वातावरण. आणि त्या बंगाई झुल्यावर फक्त ती आणि तो.

तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन शांत मनाने, प्रेमाने त्याच्याकडे पाहावं, शब्दांची गरज नसावी. नजरेतूनच प्रेम ओसंडून वाहवत राहावं.

किती गोंडस कल्पना आहे?

विजयने ही सत्यात उतरवली होती, त्याच्या प्रिये साठी.

तिचं खरं नाव प्रिया, पण तो लाडाने प्रिये म्हणतो, आजही…
आजही असं का बोललो प्रश्न पडला असेल ना? आज दोघांनी पन्नाशी ओलांडली होती. खूपच वेळ लागला स्वप्न पूर्ण करायला. पण जवाबदारी पूर्ण करणं तितकंच महत्वाचं होतं.

हो त्यांना एक मुलगा आहे, स्वरूप.
आज तो रोबोटिक्स इंडस्ट्री मध्ये एक रिसर्च सिइंटिस्ट म्हणून काम करतोय. अर्थातच पाश्चात्य देशात, पैशासाठी नाही, पण तो हरहुन्नरी आहे.
जे आवडतं ते करावं अश्या विचाराचा विजय, तसाच त्याचा मुलगा स्वरूप. विजय खूप मेहनती होता, आजही आहे, करण तो आजही थांबला नाही, पैसे गर्जेइतके असायचेच.
स्वरूप ही तसाच, विजय सारखा.
आज स्वरूपही बंगाई झुल्यावर बरोबर असता.
पण.. हा दुरावा…
विजय आणि स्वरूप ने हा दुरावा कधीच स्वीकारला होता,
पण प्रियेसाठी फार कठीण होते.

असो, आज ती वेळ आली जिची विजय आणि प्रिया दोघे आतुरतेने वाटही पाहत होते आणि प्रयत्नही करत होते

मराठी मराठी कथा मराठी कल्पना विश्व मराठी काल्पनिक कथा मराठी गूढ कथा मराठी प्रेम मराठी प्रेम कथा मराठी भयकथा मराठी भावना विश्व मराठी भावुक कथा मराठी रहस्य कथा मराठी रोमांचक कथा मराठी विश्व