Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – भाग ३

विजय शांत बसला होता. एकटक एका ठिकाणी दूरवर पाहत होता. त्याच्या मनात घालमेल चालू होती बहुतेक.

प्रिये

काय रे? आता विचार बदलतोस का? आता इथे नाहीये ती. ऑस्ट्रेलिया ला गेलीये, ते पण चौथं लग्न करून

विजय हसत

नाही गं.
मी बोललो होतो आपण एक दिवस एक होऊ.
खरंच झालो का?

विजय गंभीरपाणे विचार करत होता आणि विचारात होता

प्रिये त्याला धीर देऊन म्हणाली

एक कधीच काही नसतं विजय, जे आहे त्याचं अस्तित्व तसंच अबाधित असतं. आपण किंवा कोणीही अगदी परमात्माही आपल्याशी एकरूप होऊ शकतो, एक नाही. आणि हि एकरूपता किती काळ टिकावी हे दोघांवर अवलंबून असते

विजय त्यात होकार देऊन म्हणाला

हो खरं आहे. प्रिये मला वाटतं आपलं आयुष्य ना फार छोटे आहे. आपले अनेक जन्म आणि त्यांचा प्रवास म्हणजे जर नदी सारखा समजला तर आपण त्यात हळुवार तरंगणाऱ्या एखाद्या झाडाच्या पानाप्रमाणे असतो. दोन पानं एकत्र येतात, एका लयीत तरंगतात, त्यांचा प्रवास करत असतात. असं भासतं जणू ते दोन नाही एकच आहेत. त्यांचं पुढे कधी काय होतं काही कळत नाही.

प्रिये अचानक त्याला थांबवून म्हणाली

आणि तिसरं विजया नावाचं पान कधी येऊन भेटतं कळत नाही.

विजय बचकला

विजया नावाचं पान?

प्रिये हसत बोलली

अरे गम्मत करते तुझी. तू वाहवत चाललास.
ये जागेवर

थोडा वेळ दोघेही शांत होते.

प्रिये म्हणाली

खूप सुंदर होती आपली सुरवात. तुझ्या तुटपुंज्या पगावर आपण भाड्याच्या घरात राहत होतो, चाळीत. पण खूप सुंदर सुरवात होती. आपल्या दोघांच्या घरचे आंतरजातीय विवाहासाठी कधीच तयार होणार नाहीत हि कल्पना तर होतीच आपल्याला. मला लग्नाआधी ज्या किमती गोष्टींची गरज असायची त्याची उणीव कधीच जाणवली नाही मला, किंबहुना तूच ती जाणवू दिली नाही. मला खूप छान वाटत होतं. माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी तू हि तुझं ऐशोआरामचं आयुष्य सोडून अंगमेहनत घेत होतास माझ्यासाठी. कोणाचे इलेक्ट्रिक चे काम, अँटिना फिटिंग, वेल्डिंग जे पडेल ते काम केलंस. फक्त आणि फक्त माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी. जवळ जवळ तीन वर्षे असू आपण तिथे, हो ना?
स्वरूप दीड वर्षाचा होता तेव्हा सोडावं लागलं ते घर

विजय मधेच थांबवून बोलला

पण प्रगतीच झाली आपली, ते घर सोडलं म्हणून. नाही तर आज प्रिये रिसॉर्ट्सची इतकी मोठी चैन उभी नसती करता अली. माझ्या प्रिये ला ते सगळं देता आलं जिची तिला सवय होती.

प्रिये मंद हसली

हो. पण तरी खूप गोड आठवणी आहेत तिथल्या, त्या छोट्याश्या खोलीत आपण किती स्वप्न रंगवले, किती गप्पा केल्या. एकमेकांसाठी खूप वेळ होता आपल्याकडे. आणि हळूच स्वरूप येण्याची चाहूल लागली. एका आई साठी हि किती मोठी बातमी असते हे फक्त तिलाच कळतं. त्याच घरात स्वरूप चालू लागला. लुटूलुटू चालायचा पडायचा. खरं तर माझा आत्मा आजही तिथे असतो.

विजय मधेच थांबवून बोलला

आणि खोटे आरोपहि त्याच घरात लागले. त्या विजया नावाच्या पानाने आपली पानं दूर केलीच असती जर तुझा विश्वास नसता माझ्यावर तर.

प्रिये हसत बोलू लागली

मला खूप गम्मत वाटायची. मला तू कसा आहेस चांगलं ठाऊक होतं. त्यामुळे शंका घेण्याचा प्रश्नच नव्हता.
ती दर एक दिवसाआड फोन करून काहीतरी काम काढायची.
आहो ताई विजया बोलते विजय आहे का.

हाहाहाहा

आणि विजय जायचा लगेच विजया च्या मागे

विजय स्पष्टीकरण देऊ लागला

अगं, तेव्हा आपली परिस्थिती काय होती? गरज होती पैसे कमावण्याची. ती खोटं बोलते मलाही कळायचं पण तिच्यामुळे चार पैसेही मिळत होते. छोटंमोठं फूझ चं काम केलं कि पैसे सुटायचे.

प्रिये

आणि सगळे एकदाच वसूल केले तिने

विजय नाराजीच्या स्वरात

हो. उगाच खोटा चोरीचा आळ आणला माझ्यावर. म्हणजे सोन्याची चैन तिच्याकडेच होती मला दाखवून बोलते कि स्वरूप मला हवा आहे, तो दे तर तुझा आरोप मागे घेते, नाही तर पोलिसात देते. म्हटलं दे. परवडलं मला.
पण खरंच त्यावेळी तुझा माझ्यावरचा विश्वास आणि माझ्यासाठी केलेला त्याग ह्यामुळेच वाचलो मी. तू जर तुझ्या बाबांची आठवण असलेली चैन तिला दिली नसती तर कठीण होतं प्रकरण.

प्रिये

जाऊदे रे. तुझ्याइतकं महत्वाचं कोणी नाही माझ्या आयुष्यात. मला त्या बाईची नजर खूप आधीच कळून येत होती. तिचंही आयुष्य फार भेदरलेलं होतं. खूप काही हरवलं होतं त्या बाईने तिच्या आयुष्यात आणि तेही अचानक. अशा वाईट परिस्थितील लोकांची नजर लागते. तिचं असं वागणं मला काही आश्चर्यकारक वाटलं नाही. आणि हे सगळं फक्त एका सोन्याच्या चैन ने निभावणार असेन तर काय हरकत होती?

विजय

पण आज आता हे सगळं का आठवतंय तुला?

प्रिये

अरे भोळा रे भोळा. तू मला जाणीव करून दिली ना कि तू काम करतोयस. म्हणून मी पण माझ्या प्रेमाची जाणीव करून दिली.

हाहाहाहाहा

विजय

हाहाहाहाहा
बरं. चला ऊन लागतंय आता.
जेवायचं बघावं लागेन.

दोघेही उठून आत गेले