Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – भाग 5

दोघेही आवरून थोडा वेळ वरांड्यात बंगईवर होते. निशब्द आणि शांत होते, विजयला सगळं कळत होतं. प्रिये अंतःकरणातून स्वरूप ची आठवण काढत होती, आता तिला दुसरं काहीच चांगलं वाटणार नव्हतं. त्यामुळे विजय काही प्रयत्नही करत नव्हता, उगाच तिची शांतता भंग करून त्रास देण्यात काही अर्थ नव्हता.

थोड्या वेळात विजय बोलला

चल अराम करू

इतक्या लवकर? आत्ताशी सडे आठ झालेत

प्रियेने प्रतिक्रिया दिली

विजय शांत बसून राहिला

काहीच क्षणात प्रिये बोलली

चल जाऊया आत, आता हि शांतता भकास वाटतेय

विजय काहीही ना बोलता तिच्याबरोबर गेला, दोघांनी पाठ टेकवली

दार नीट लावलं का रे?

प्रियेने जड आवाजात विचारलं

हो.. काही काळजी करू नको शांत अराम कर

असं म्हणत विजयने प्रियेच्या डोक्यावरून हाथ फिरवला. एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे प्रियेला गाढ झोप लागली

काचेचा टीपॉय फुटल्याचा आवाज होता

दोघेही घाबरून उठले
दोघांनी एकमेकांना गच्च धरून घेतलं

पण विजय ने घाई करत काठी उचलली आणि दार उघडण्यासाठी धावला
प्रिये जोरात ओरडली

थांब, काही संकट आहे अंदाज येऊ दे

विजय ने तो पर्यंत दार उघडलं आणि काठी उगारली

तितक्यात एका मुलीचा आवाज आला

Hey!!! Wait Wait… please wait….

पप्पा आई मी आहे

प्रिये विजयच्या मागे येऊन उभी राहिली आणि घाबरतच बोलली
मला स्वरूप च्या आवाजाचा भास हतोय रे

विजय धावत जाऊन घरातले दिवे लावतो

त्यांना अख्या घरात फुगे पडलेले दिसतात, काही रिबन लटकलेल्या. काही अक्षर अर्धवट लावलेले.
एक गोरी गोमटी सुंदर ब्रिटिश मुलगी, जिच्या हातात आणि खांद्यावर रिबिन्स आहेत.
आणि फुटलेल्या काचे जवळ स्वरूप खाली पडलेला रश्शीच्या गुंत्यात

विजय आणि प्रिये दोघांनी एक्मेकांडे बघून हा भास नसल्याची खात्री करून घेतली
आणि धावत त्याच्या जवळ गेले

अरे बाळा!!! हे काय झालं रे?

तिघे घाईघाईने स्वरूपला रश्शीच्या गुंत्यातुन काढण्यात लागले.
त्या ब्रिटिश मुलीने झटक्यात तो गुंता सोडवला आणि स्वरूप मोकळा झाला
विजय आणि प्रिये दोघांच्या जीवात जीव आला, त्यांनी दोघांना फुटक्या काचेपासून दार नेले आणि तिला शाबास बोलले

आता हळूहळू विजय आणि प्रिये दोघेही शुद्धीवर येऊ लागले

हि मुलगी कोण?
अरे तू इथे कसा?
हे सगळं काय आहे?
असा चोरासारखा का आलास?
हा सगळं काय पसारा आहे?
तुला लागलं तर नाही ना जास्त?

अगं आई.. थांब जरा.

प्रियेला थांबवून स्वरूप बोलू लागला

जरा पाणी तर दे दोघांना, सगळं सांगतो.