Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – भाग 6

अरे तुम्ही दोघे जेवणार ना?

विजय आणि प्रिये एकाच सुरात बोलले
दोघेही आपला आनंद लपवू शकत नव्हते,
दोघांचेही डोळे विस्फारलेले, पाणावलेले, प्रेमाने भरून वाहत होते.
त्यांचे स्मित असीमित झाले होते. एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत ओठ पसरले होते.

एव्हाना त्यांना अंदाज आला होता.
हा आपलाच मुलगा नक्की प्रेमात पडलाय.

जेवणाच्या वेळी आलेला विचार खरा होणार होता, त्यांचा मुलगा आणि सून त्या रिकाम्या खुर्च्यांवर बसणार होते.

विजय आणि प्रिये दोघेही त्यांना खुर्चीवर बसवून स्वयंपाक करायला गेले.

त्यांचा वेग दुप्पट झाला होता.
प्रियेच्या तुटक्या पायातही त्राण आले होते, विजय मदत करायच्या आधी तिला हवं ते ती घेत होती
तोंडातून शब्द फुटत नसले तरी डोळ्यातून ते एकमेकांशी खूप काही बोलत होते.

काय गं प्रिये त्याला आवडते खरंच का फक्त मैत्रीण आहे?

प्रेम असणार त्याचं, आणि ती पण प्रेम करत असणार स्वरूपवर, उगाच कोणती मुलगी इतक्या दुर येणार नाही.

हो पण आताचे मुलांचं काही सांगता येत नाही,

असं काही नाही, मी सांगते ना. मुलीचं मन मला कळतं

सगळे जेवायला बसले, सगळ्यांचं जेवण झालं होतं, पण तरीही थोडं सगळ्यांबरोबर खाऊन घ्यावं म्हणून बसले.

पाच सात मिनिटे निशब्द शांताता होती. स्वरूप हळूच आई पप्पांकडे पाहून हसत होता, त्याला दोघांना पाहून आनंद होत होता.
आणि बोलला

आई पप्पा, हि मिटलिंडा…
आपण हिला मिठी बोलू, सोप्पं आहे बोलायला

प्रियेने मिठीच्या हनउटीवर बोट ठेवून तिचा चेहरा वर केला
बऱ्याच वेळचं तिने डोळे वर करून पाहिलंच नव्हतं, एखाद्या भारतीय नारी प्रमाणे ती आदर ठेऊन होती.
सगळं आश्चर्यकारक वाटत होतं

खूप सुंदर मुलगी होती मिठी. ब्रिटिश दिसत होती, पण डोळे आणि केसं काळे होते. त्वचा अगदी नितळ आणि स्वच्छ होती.
प्रिये हळूच आणि प्रेमाने बोलली

खूप सुंदर आहेस गं तू.
स्वरूप आवडतो का तुला?

विजय अवघडल्या सारखा झाला
त्याला वाटलं हा विषय काढायला इतकी घाई करायला नको होती

मिठी ने स्वरूप कडे पहिले, प्रिये काय बोलली हे तिला जाणून घ्यायचं होतं
स्वरूप बोलला

Mom said, “You are very Beautiful”

मिठीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, ती स्वरूप कडे पाहून तिचा स्वीकार झाल्याचं सगळ्यांना सांगत होती.

विजय च्या मनात विचार बदलला आणि प्रियेने योग्य तेच बोलल्याचं त्याला कळलं
तो टाळ्या वाजवत म्हणाला

चाला आज मुलगा सेट झाला,
काय रे, हे सांगण्यासाठी सरप्राईझ दिला का?

नाही पप्पा, प्लॅन वेगळाच होता पण फसला.
खरं तर आम्ही तुमच्या लग्नाचा वाढदिवस आणि नवीन जागेच्या/ आयुष्याच्या शुभेछया देण्यासाठी आलो होतो.
गपचूप तयारी करायची होती पण मी टीपॉय वरून खाली पडलो काच फुटली आणि सगळं सरप्राईझ वाया गेले

स्वरूप उत्तरला

पप्पा मी.. म्हणजे आम्ही नेहमीसाठी इथेच राहायचा विचार करतोय

विजय आणि प्रिये दोघेही खाली मन घालून जेवण संपवत होते.
दोघेही हसत एकमेकांकडे पाहू लागले, त्यांना असं वाटलं कि त्यांना भास झाला, जे त्यांच्या मनात आहे ते त्यांना ऐकून येतंय.
पण काही क्षणात त्यांना जाणवलं, दोघांना एकाच वेळी कसा भास होईन.

ते दोघे स्वरूप कडे पाहू लागले, अगदी आश्चर्यकारक नजरेने

मिठी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ती होती, काही वेळ राजकारणातही होती. पण आता ती हि कंटाळली आहे.
आई पप्पा, खूप पैसे कमवून झाले, नावही झालं.
आता मला स्वामी विवेकानंदाचे वाक्य आठवते
हि प्रसिद्धी फक्त डुकराच्या विष्टे सारखी असते
इतरांचा चोथा खाऊन झालेला चोथा, ज्याला काही अर्थ नसतो

आम्ही दोघेही आता चांगलं आयुष्य जगायचा विचार करतोय. लग्न करून तुमच्या सारखा सुखाचा संसार करायचंय. थोड्या सोयी कमी असतीं तर जुळवून घेता येईन, पण आनंदी सुखी आयुष्य जे प्रेमात मिळवता येतं तसं कुठेच नाही. मिठी खूप चांगली मुलगी आहे, ती नक्कीच सगळ्यांना खुश ठेवेन, हळू हळू सगळं शिकुन घेईन, काही दिवस त्रास होईन पण सगळं सुरळीत होईन. मीही पप्पांसोबत काम करेन.

आई पप्पा, चालेन ना?

विजय आणि प्रिये एकमेकांकडे पाहत होते, हे स्वप्न आहे कि सत्य?
अगदी काही वेळापूर्वी जे स्वप्न होत ते अचानक सत्यात कसं उतरलं, उगाच गम्मत करण्याचा किंवा मस्करी करण्याचा स्वभाव स्वरूप चा नाही.
दोघांच्या अंगाला कंप सुटला होता

स्वरूप पुन्हा बोलला

आई पप्पा आम्हाला तुमच्या बरोबर राहायचं

विजय आणि प्रियेने झटकन उठून दोघांना घट्ट मिठी मारली