Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग १

सरिताच्या योजने नुसार आता ती वेळ आली होती कि ती तिच्यासाठी सुंदर नवरा शोधेन, आज तिचा चोविसावा वाढदिवस होता आणि तिला हे लक्षात देखील नव्हते.

रात्री चे दहा वाजले होते ती नुकताच तिच्या फ्लॅट मध्ये आली, नेहमी प्रेमाने आजही कामाची दगदग होती, खूप मेहनतीने अभ्यास करून तिने हि नौकरी मिळवली होती, तिच्या योजनेनुसार तिला चांगला पगार मिळत होता. तिने घरी आल्या आल्या बॅग सोफ्यावर टाकली आणि पलंगावर आडवी झाली. खूपच जास्त थकली होती. आणि अचानक आईचा फोन आला

सरिता

काय गं आई? आता कुठे फोन केलास तू? किती थकले मी, आता नाहीये माझ्यात बोलायची ताकत. उद्या बोलू आपण

आई

अगं असा काय करतेस, इतकं काय ते काम करायची गरज आहे? आणि तू जेवलीस का? कसली जेवलीस तू नक्की घरी येऊन पसरली असणार तू, अगदी हातपाय ना धुवता. चांगली ओळखून आहे मी तुला, नजरेसमोर अस्वछता ठेवायची, आता तर काय मोकळं रान भेटलं वेडीला, सांगत होते परी ला बरोबर ठेव, ती नाही तर दुसरी फ्लॅटमेट ठेव. पण नाही आम्हाला स्वछंद जगायचं, हवं ते करायचं, कसलं भाण ठेवायचं नाही, मन मर्जी वागणं शोभत नाही पोरींना, नको ते संकट लागेन मागे. सांगून ठेवते मी.

सरिता

काय गं, मी थकले इतके आणि काय पकवतेस मला?

आई

काय? पकवते? अगं काय ते जिभेला हाड तुझ्या? सगळी नाती तुटली तुझ्यासारख्या मुली मुळे. काय कामाचा हा फटकळ पणा? किती जणांना दुखावलंस तू. सगळे दूर झालेत. शेवटची भेट तरी कोणी देईन कि नाही ठाऊक नाही आम्हाला दोघांना. एकटी म्हणून लाडावली. काय बिघडलं कोणी चांगलं स्थळ आणलं तर? त्यांनी काही पाप नव्हतं केलं त्यांचा अपमान करायला

सरिता

आई बस…

आई

का काय झालं? फक्त दिसायला सावळा होता. पण देखणाच होता. बरं नुसतं मना करून चाललं असतं पण तू त्यांच्या आई वडिलांचाही अपमान केलास. चूक झाली गं बाई, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला होता. दिवसभर वाट पहिली कि तुला आठवण येईन आई बापाची, पण नाही मूर्ख आहोत आम्ही. तुझ्या जीवाला धोका नको म्हणून पोट फाडून जन्म दिला तुला, आमची मुलाची हौसही मारली आम्ही तसंच जगलो दुःख गिळत

सरिता

या पुढे अजिबात फोन करू नकोस मग

आई बाबांनी पुन्हा फोन ना करण्याचा ठरवलं – आपण निपुत्रिक आहोत असं समजू
सरिता फार जास्त चिडली होती
आज चोवीस वर्षाची झाली तिच्या योजनेनुसार ती कामाला लागली होती, पण तिची योजना योग्य नव्हती. जश्या पैशाच्या मागे सुंदर मुली लागतात तसाच एखादा सुंदर मुलगा तिच्या पैशासाठी तिच्याशी लग्न करेन असा तिचा समज होता

त्या दृष्टीने किंवा त्या वाटचालीचे तिचे प्रयत्न नव्हते. ती फक्त वाट पाहत होती. आज पर्यंत तिच्या आयुष्यात कोणीच आलं नव्हतं. किंबहुना ती कोणाला तशी संधीच देत नव्हती. तिच्या सुंदरतेच्या व्याख्येत येणारा एकही मुलगा तिला दिसला नव्हता. मुंबई सारख्या शहरात दिग्गज नावाजलेल्या कंपनी मध्ये ती काम करत होती. आणि तिच्या कडे आज एक गोष्ट अजिबात नव्हती ती म्हणजे वेळ.

अचानक सरिताच्या लक्षात आलं तिचं मूळ उद्दिष्ट, ते म्हणजे सुंदर नवरा शोधणे, आता तिची जिद्द शिघेला पोचली.

ती विचार करत करत झोपली

अचानक एका सुंदर स्वप्नात तिने प्रवेश केला.

सरिता पहिल्या माळ्याच्या मोठ्या बाल्कनीत बसली होती. समोर खूप सुंदर गार्डन होतं. काही मुलं खेळत होते. सकाळचा सुंदर प्रकाश समोर चहा आणि टोस्ट आणि ऑम्लेट … ऑम्लेट कोणी आणले ? सरिताच्या शैलीत बसणारे नव्हते हे… तिने पाहिलं दुसऱ्या खुर्चीवर कोणीतरी बसलं होतं. ती दचकली, थोडी घाबरली … पण तो खूपच सुंदर होता. अगदी तिला हवा तसाच.

लांब चेहऱ्याचा, दाट केसांचा, छान कलर केलेले केस, नीटशी दाढी, गोरापान, उंच आणि काटक शरीराचा. त्याचे डोळेही निळे होते, हाणुऊटीवर खड्डाही होता, फक्त हसल्यावर खळी पडते कि नाही हेच कळणं बाकी होतं.
सफेद सूट मध्ये बसला होता त्याने अचानक तिच्या कडे पाहिलं
अत्यंत आत्मविश्वासाने तिच्याकडे पाहत हसला आणि त्याची खळी दिसली, तो म्हटला

खूप सुंदर आहेस तू

त्याने उठून तिच्या कपाळावर चुंबन घेतले

सरिता सातव्या ढगात होती

मराठी, मराठी कथा, मराठी काल्पनिक कथा, मराठी भयकथा, मराठी विश्व, मराठी रहस्य कथा, मराठी गूढ कथा, मराठी कल्पना विश्व, मराठी रोमांचक कथा, मराठी प्रेम कथा, मराठी प्रेम, मराठी भावना विश्व, मराठी भावुक कथा