सकाळचा अलार्म वाजला आणि ती जागी झाली. स्वप्नं तुटलं… खरंच तुटलं स्वप्न?
ती आतासुद्धा त्याच स्वप्नात हरवलेली होती. तिला वाटत होतं हे सगळं खरंच घडलं. ती शहरलेली होती, खूप प्रसन्न वाटत होतं. एखाद्या नव्या शक्तीचा संचार व्हावा तशी ती झरझर सगळं काम करत होती.
अनेक दिवस उलटले, ती त्या स्वप्नातून बाहेर येऊ शकत नव्हती. अचानक तिच्या वाचण्यात आलं कि स्वप्न खरे होतात, आपण ते करू शकतो. ती पुन्हा जिद्दीला पेटली. ती कळत नकळत तसे घर शोधू लागली.
एक दिवस तिला ते घर सापडलं, अगदी तेच घर, तिच्या आवाक्यात, फक्त थोडं लांब कांदिवली ला होतं. तिने ताबडतोब दलालाला फोन लावला आणि सांगितलं कि हा फ्लॅट तिला भाडेतत्वावर हवा आहे आणि कसलाही विचार ना करता तिने टोकन किंमत पाठवून दिली. जेव्हा तिने पहिली भेट दिली त्या घराला तेव्हा ती पूर्ण शहरलेली होती, तिला तो तिथेच असल्याचा भास होत होता. दलाच्या प्रश्नांना उत्तर देत नव्हती, फक्त आनंदाने सगळं घर पाहत होती. सगळा व्यवहार झाला. ती ताबडतोब राहायला आली.
आता ती रोज कामावरून लवकर घरी येऊ लागली, ती वेड्या आशेत होती कि तो दिसेन, तो येईन, तिला भेटेन, तिला बोलेन कि तो तिच्यावर प्रेम करतो. त्यांचं लग्न आणि मुलांची नावं सगळं ठरलं होतं. ती रोज संध्याकाळी नटून थटून बसायची, त्याची वाट पाहत होती. तो आला कि त्याच्याशी अशी बोलेन असं वागेन, त्याचा हात हातात घेईन, त्याच्याबरोबर बालकनीत गप्पा मरेन, त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपून जाईन. सगळ्याचा सराव करत होती. तिला सतत भास होत होता कि तो तिला पाहतोय. ती बऱ्याच वेळा बालकनीत, खिडक्यांतून बाहेर डोकावून पाहत होती कि तो इथेच कुठे राहत असावा. एकदा तिने एका मुलाला पाहिले जो समोरच्या इमारतीतून तिच्याकडेच पाहत होता, थोडा सावळा होता, देखणा होता. पण… तो हा नव्हता
अनेक दिवस उलटले, आता तिचा भ्रमनिरास होऊ लागला होता. आता तिला वाटत होते हे तिच्या मनाचे खेळ.
ती खूप रडली, तिचं हृद्य तुटलं होतं.
ती तशाच उतरत्या चेहऱ्याने कामावर जायला निघाली. लिविंग रूम मधून दरवाजाकडे जात असताना …
अचानक कोणीतरी खांद्यावर हाथ ठेवला आणि आवाज आला
ए राणी, अशी उदास नको होऊस ना.