Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ३

तिच्या सर्वांगावर शहरे आले होते. हा तोच आवाज आहे का ज्याची ती अगदी आतुरतेने वाट पाहात होती? पुढचे अनेक प्रश्न तिच्या मनात येण्या आधीच ती मागे वळली..

तिचे डोळे स्थब्द झाले.

पुन्हा आवाज आला

ए राणी, अशी उदास नको होऊस ना. जशी आहेस तशीच राहा ना. खूप सुंदर आहेस तू…

सरिता आता हळू हळू शुद्ध हरपू लागली, तितक्यात त्याने तिला सावरलं.

ती त्याच्याकडे पाहत होती, हळू हळू तिचे डोळे पाणावले, ती खूप निरखून त्याला पाहत होती. तिच्या नजरेत अपार प्रेम होते, खूप प्रश्न होते, तक्रारी होत्या.

तिने घट्ट मिठी मारली आणि ओक्साबोक्सि रडू लागली.
सरिता

इतकी परीक्षा घेता का कोणी?

किती वाट पहिली मी तुझी, वेडी झालीये मी तुझ्यासाठी, तुला माहिती आहे मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी रोज सजून होते, तुझ्या चेहऱ्याची वाट पाहत, तुझ्या आवाजाची वाट पाहत, तुझ्या सहवासाची स्वप्न पाहत. तुला काहीच काळजी वाटली नाही का? सांग ना.. का इतका उशीर केलास यायला? तुझ्यात हरवून जायचंय मला. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…

त्याने तिच्या डोक्यावरून पाटीवर हाथ फिरवला आणि बोलला

शांत हो गं माझी राणी, मी हि खूप प्रेम करतो तुझ्यावर, म्हणून तर इतक्या दुरून आलो. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी

सरिताने मिठी सोडली आणि थोड्या दुरून त्याला मन भरून पाहत होती. तिच्या आसवांचा अडसर तिने दूर केला आणि पुन्हा त्याच्याकडे पाहत राहिली.

चार ते पाच तास उलटले. ती कामावर जायचे विसरली होती. त्याने तिला हळूच जवळ केले आणि बोलला

उपाशीच ठेवणार आहेस का तुझ्या राजाला?

ती हळूच हसली आणि स्वयंपाक घरात गेली, तिने भरभर जेवण बनवले आणि त्याला स्वतःच्या हाताने भरवत होती, अधून मधून तोही तिला भरवत होता. दोघांमध्ये काही संवाद होत नव्हता, दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत होते. सरिताच्या डोळ्यातून मधूनच अश्रू गळत होते, आणि तो ते टिपून घेत होता.

आता सरिता त्याच्या मांडीवर डोके ठेऊन झोपली, आताही त्यांच्यात संवाद नव्हता, तो हळू हळू तिच्या केसांतून हात फिरवत होता. सरिताला हि स्वर्गानुभूती वाटू लागली, तिचा डोळा कधी लागला काहीच कळले नाही.

रात्री एक वाजता जाग आली, तो तिथे नव्हता. ती झटकन उठली आणि त्याला शोधू लागली. सगळ्या खोल्यांमध्ये तिने पहिले ती एकदा, दोनदा, अनेकदा पाहू लागली, सैरावैरा धावू लागली, तिला चैन पडत नव्हते, ती पुन्हा पुन्हा शोधत होती. अचानक नजर दरवाज्यावर गेली तर दार उघडे दिसले, मग तिला अन्दाज आला कि तो गेला.

ती पुन्हा उदास झाली आणि लिविंग रूम मधेच बसून राहिली. गुडघ्यांवर हात आणि डोके ठेऊन विचार करू लागली, रडू लागली. ती एकटीच बडबडत होती.

काय चुकले रे मी राजा? मी जेवण तर चांगलं केला होता ना, तुला काही चुकून बोलले का मी? मी रडल्यामुळे चांगली नव्हते दिसत रे, परत ये ना.

सरिता हरवली होती, तिला सहन होत नव्हते. तिचे मन काहीही अंदाज काढू लागले. ती पुन्हा खिन्न झाली होती.