Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ६

सरीताला जरा उशिराच जाग आली, ती हि दरवाजा कोणी वाजवला म्हणून. तीची शक्ती पूर्णतः जीर्ण झाली होती. ती कशीबशी उठली आणि दरवाजा उघडला. तोच मुलगा जो तिला आधी बालकनीतून पाहायचा, समोरच्या इमारतीतला.

तो म्हटला

मी विशाल, पोलीस चौकीत आहे मी नाक्यावरच्या. बरेच दिवसाचा लक्ष ठेऊन आहे.

आम्ही तसे तक्रारी शिवाय कधी कोणत्या दरवाज्यावर जात नाही, पण गडबड वाटली

सरिता त्याला मधेच थांबवून बोलली

गडबड? नाही तसं काही नाही. आणि मी अशीही दुबई ला चालले, कालच लग्न झाला माझं.

विशाल

काय? काल?

बरं ठीक आहे, हे कार्ड ठेवा आणि गरज लागली तर लगेच फोन करा

विशाल निघून गेला

सरिताने दार लावलं, आणि तिने घराकडे नजर फिरवली.

ती घाबरली, ह्याच घरात तीच कालच लग्न झालं, आणि इतकं साफ कसं?

तितक्यात तो आला

अगं राणी, घाबरतेस काय?

आणि हे काय तुझ्या हातात?

सरिता

अरे काही नाही, पोलीस राहतात समोरच्या इमारतीत ते आले होते. काहीतरी गैरसमज झाला असणार त्यांचा

तो अचानक संतापला.

हिम्मत कशी केलीस तू दुसऱ्या पुरुषाला भेटण्याची?

सरिता

अरे पण तो आला होता घरी

तो

मी सोडून कोणताही दुसरा पुरुष तुझ्या आयुष्यात नसेन, कोणत्याच पुरुषाशी बोलायचं नाही तू , फक्त मी, मी आणि मीच असणार

तो संतापाने लालबुंद झाला होता, थरथरत होता

सरिता घाबरली आणि बोलली

अरे राजा लग्न झालाय आपलं, आता मी फक्त तुझीच असणार. पण कामावर तर दुसऱ्या पुरुषांशी बोलावच लागतं

तो आणखी संतापला आणि त्याने पैशाने भरलेली सुटकेस तिच्या समोर रिकामी केली

किती पैसे हवेत तुला? दहा वर्षात जितके कमावशीन तितके आहेत हे. पण आजपासून तू बाहेर जायचं नाही. कामावर कळव कि तू दुबईला चाललीस.

हि दारं खिडक्या बंद ठेव, इथे फक्त तू आणि मीच असणार

सरिताला काय करावे कळत नव्हते, खरं तर तो इतका सुंदर होता कि तिने त्याला ताब्यात ठेवायला हवे होते. सगळ्या मुलींपासून दूर. पण आज तो तिच्यासाठी इतका वेडा झालाय.

तू जे सांगशीन ते सगळं ऐकेन रे राजा. तू जे बोलशीन ते. इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर? आज आता जर तू माझा जीव मागितला तर ओवाळून टाकेन तुझ्यावर.

तो भावुक झाला

मला जीव नकोय गं राणी तुझा. तू फक्त माझ्याशी बोलत राहा, इथेच बस. अशीच खुश राहा माझ्याशी बोलताना.

सृष्टीचा अंत झाला तरी चालेन पण मी इथून हलणार नाही. पर्वा नाही मला कसलीच. तू माझी आहेस, फक्त आणि फक्त माझीच.