Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ७

आज एक वर्ष झालं दोघांच्या लग्नाला

सरिताच्या आईला फोन आला

नमस्कार मावशी, मी विशाल देशपांडे बोलतोय. ओळखलंत का?

अरे बाळा कसा आहेस? माफ करा रे, सरिता खूपच वाया गेली, इतके लाड केले आम्ही, तिला भानच राहत नाही आपण कोणाचा अपमान करतोय ते

अहो मावशी, जाऊद्या ते आता, झाला गेलं विसरू.

आता सध्या विषय गंभीर आहे, चिंता करू नका. मी सर्व पाहून घेतो, पण तुम्ही दोघे मुंबई ला यायला निघा. गरज आहे सरिता ला तुमची.

सरिताचे आई वडील दोघेही निघाले ते थेट मीरा रोड नाक्यावरच्या पोलीस चौकीत पोचले. विशाल त्यांना घेऊन इस्पितळात आला.

सरिता ज्या वॉर्ड मध्ये आहे तिथे तो घेऊन गेला. सरिता बेड वर होती. शांत झोपलेली. तिला झोपेचे इंजेकशन द्यावे लागले होते. तिचा अवस्था फारच वाईट होती. शरीर पूर्ण जीर्ण झाले होते, फक्त हाडं दिसत होती. गालावरही मास उरलेले नव्हते.

डॉक्टर आले आणि सांगू लागले.

पेशंट फारच गंभीर मानसिक अवस्थेत आहे, जितकी शाररिक अवस्था दिसते त्यापेक्षा गंभीर तिची मानसिक अवस्था आहे. गेल्या एका वर्षांपासून पेशंट ने काहीच खाल्लेले नाही. फक्त प्रोटीन डाएट आढळून येतोय, बहुदा मास खाल्लंय आणि तेही साधारण नाही, कदाचित किडे, मच्छर, मुंग्या, झुरळ ह्यांच सेवन असावं. पेशंट बरं होणं दुर्मिळ गोष्टीसारखं आहे.

असे बोलून डॉक्टर चालले गेले.

आई वडील दोघेही काळजीत पडले, रडू लागले. तितक्यात विशाल त्यांना म्हणाला

हे सगळं नीट होईन काळजी करू नका. माझ्या ओळखीत एक तांत्रिक आहे. आता हे काम तेच करू शकतात

सगळे सरिताला घेऊन गाडीने तांत्रिक कडे पोचले

विशाल ने माहिती द्यायला सुरवात केली, विशाल म्हणजे हा तोच सावळा देखणा मुलगा जो सरिताला लग्नाची मागणी घालायला आला होता आणि अपमान पदरी घेऊन गेला. आणि तोच तिच्यावर समोरच्या इमारतीतून लक्ष ठेऊन होता.

मी जेव्हा सरिताला तिच्या घरातून बाहेर काढलं तेव्हा दरवाजा फोडून आम्हाला जावे लागले. जेव्हा दार तोडलं तेव्हा सरिता विवस्त्र अवस्थेत भिंतीकडे तोंड करून बसली होती, हसत होती, काहीतरी पुटपुटत होती. तिचे शरीर हे जीर्ण होते. तिला उठवणं खूप ताकतीचं काम होतं. माझा अंदाज आहे कि काही तरी वाईट शक्ती आहे, त्याशिवाय अशा अवस्थेत कोणी कशी टाकत लावू शकेन?

मी आधी पासून सरितावर लक्ष ठेऊन होतो, कारण तिला ज्या दलालाने फ्लॅट दाखवला आणि तिचा पोलीस वेरिफिकेशन सर्टिफिकेट घेतलं तेव्हा त्यानेच अंदाज दिला कि काही तरी गडबड वाटते.

मी बऱ्याच वेळा तिला खिडकीतून बाल्कनीतून डोकावताना पाहिलं. कोणाला तरी सतत शोधात होती ती. पुढे तिच्या सवयी अजून विचित्र झाल्या, ती बाल्कनीत एकटीच गप्पा मारत चहा पीत असे. कधी खुर्चीवर डोकं ठेऊन रडत असे, कधी हसत असे, कधी खुर्चीवर हात फिरवत असे. कधी घरात एकटीच धावताना आढळली.

मी एकदा घरी गेलो, अंदाजे एका वर्षापूर्वी, तर ती बोलली तिचे लग्न झाले आणि दुबईला जाणार आहे. मग मीही प्रकरणातून लक्ष काढून घेतले.

मग एकदिवस दलालाच फोन करून बोलला कि भाडं द्याची बंद झाली हि मुलगी. मग मी तपास चालू केला. तिच्या इमारतीत राहणारे अनेकांना वेगवेगळे अनुभव आले. तिच्या खालच्या माळ्यावर राहणाऱ्यांची तक्रार होती कि सतत पाळण्याचा आवाज येतोय ते हि रात्री बेरात्री. शेजारच्यांनी भिंतीवर डोकं आपटल्याचा आवाज आल्याचे सांगितले, तर कधी कधी कण्हण्याचा आवाज येत असे. सगळे घाबरून गप्प होते. कारण घराला बाहेरून कुलूप होते.