Categories
FlexBox (फ्लेक्सबॉक्स) प्रशिक्षण

FlexBox (फ्लेक्सबॉक्स)

एक क्रांतिकारी स्टाईल ज्यांनी युसर इंटरफेस डेव्हलपर चे आयुष्य खूप सोपे केले

पूर्वी जे रचना साधण्यासाठी म्हणजेच अलिंमेन्ट साधण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागत होते, ते आता अगदी सहज करता येतात

उदाहरण सांगायचं तर व्हर्टिकल अलिंमेन्ट
valign=”middle”
हे आपण टेबल असताना वापरात होतो. नंतर DIV संरचना आल्यावर कठीण झालं. स्क्रिप्ट वापरावी लागत होती, कंटेनरचा आकार बदलला कि पुन्हा त्रुटी निर्माण होत होत्या, इतकंच काय तर प्रत्येक browser मध्ये वेगळी CSS लिहावी लागत होती.
पण आता नवीन फ्लेक्सबॉक्सने फक्त सोपं नाही तर त्याही पुढे बरंच काही करता येतं.

Categories
FlexBox (फ्लेक्सबॉक्स) प्रशिक्षण

FlexBox (फ्लेक्सबॉक्स) फायदे काय? का वापरावे?

  1. फ्लेबॉक्स CSS३ चा नवीन भाग असून त्याने विविध घटकांना (elements) एकमेकांपासून नीट मांडण्यास(alignment) सोपं केलंय. आणि तेही वेगवेगळ्या दिशेत (directions) व आराखड्यात(layout).
  2. फ्लेक्सबॉक्स वापरण्यामागची मुख्य कल्पना म्हणजे कंटेनरला उपलब्ध जागेत वाढण्याची किंवा लहान होण्याची क्षमता देणे.
  3. फ्लेक्सबॉक्स ने फ्लोट लेआऊटची जागा घेतली. कारण फ्लेक्सबॉक्सने आपण कमी, सहज समजण्या योग्य आणि तार्किक कोड लिहू शकतो.
Categories
FlexBox (फ्लेक्सबॉक्स) प्रशिक्षण

फ्लेक्सबॉक्स प्रचलित शब्दावली (टर्मिनॉलॉजि) आणि पाया

हे शब्द नीट लक्षात ठेव,
कारण पुढील पूर्ण प्रशिक्षणात हे सतत वापरात असतील

एखाद्या container ला जेव्हा आपण display:flex हि स्टाईल देतो तेव्हा तो flex-container होतो आणि तो त्याच्यातील child elements ला flex-items मध्ये आपोआप convert करतो.
आता ते एकाखाली एक ना दिसता एकमेकांच्या बाजूला दिसू लागतात
फ्लेक्सबॉक्स मध्ये आपण X-axis ला main-axis आणि Y-axis ला cross-axis म्हणतो

.container {
   display:flex;
}

सगळ्या advanced browser मध्ये चालण्यासाठी browser hacks टाकणे चांगले

.container {
   display: -webkit-box;
   display: -moz-box;  
   display: -ms-flexbox;
   display: -webkit-flex;
   display: flex;
}

display:flex प्रमाणे display:inline-flex हि वापरात आहे, display:flex जिथे पूर्ण जागा घेते तिथे display:inline-flex फक्त हवी तितकीच जागा घेते.
हे चित्र पाहून तुम्हाला सहज समजेन

Categories
FlexBox (फ्लेक्सबॉक्स) प्रशिक्षण

flex-direction (flexbox properties)

आता आपण flexbox च्या सर्व properties आणि values समजून घेऊ.
सर्वप्रथम flex-direction च्या values समजून घेऊ

आपण flex-items ची दिशा इथे ठरवतो, ते कुठून चालू झाले पाहिजे आणि कुठे संपले पाहिजे.
flex-direction ह्या property च्या ४ values आहेत.

row हि default value असून ती देण्याची तशी फारशी गरज नसते, फक्त कधी एखादी आधीच दिलेली स्टाईल मिटवून नॉर्मल करण्यासाठी आपण वापरतो. row valule flex-items एका बाजूला एक, डावीकडून उजवीकडे एक रेषेत करते , ते main-axis वर असतात

row-reverse value main-axis वर flex-items उजवीकडून डावीकडे एका रेषेत करते

column value main-axis ला cross-axis करते, म्हणजे flex-items वरून खाली एका खाली एक करते

column-reverse value cross-axis वर flex-items खालून वर करते

हे चित्र पाहून सहज समजेन

Categories
FlexBox (फ्लेक्सबॉक्स) प्रशिक्षण

flex-wrap (flexbox properties)

flex-wrap च्या ३ values आहेत

wrap हि default value आहे. ह्यात flex-items डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली आपोआप सामावून घेतले जातात

nowrap value मध्ये flex-container बाहेर flex-items चालले जातात पण ते एकाच रेषेत राहतात

wrap-reverse value मध्ये flex-items उजवीकडून डावीकडे आणि खालून वरती सामावून घेतले जातात

हे चित्र पाहून सहज समजेन

Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – कथेची ओळख

रत्नागिरीच्या समुद्रकिनारी छानस टुमदार घर. घरासमोर व्हरांड्यात एक मोठा बंगाई झुला, समोर मोठ अंगण, तुळशीवृंदावण. समुद्राकडून येणारी गार हवा. सर्व मोकळं आणि कसलाही ताण नसलेलं वातावरण. आणि त्या बंगाई झुल्यावर फक्त ती आणि तो.

तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन शांत मनाने, प्रेमाने त्याच्याकडे पाहावं, शब्दांची गरज नसावी. नजरेतूनच प्रेम ओसंडून वाहवत राहावं.

किती गोंडस कल्पना आहे?

विजयने ही सत्यात उतरवली होती, त्याच्या प्रिये साठी.

तिचं खरं नाव प्रिया, पण तो लाडाने प्रिये म्हणतो, आजही…
आजही असं का बोललो प्रश्न पडला असेल ना? आज दोघांनी पन्नाशी ओलांडली होती. खूपच वेळ लागला स्वप्न पूर्ण करायला. पण जवाबदारी पूर्ण करणं तितकंच महत्वाचं होतं.

हो त्यांना एक मुलगा आहे, स्वरूप.
आज तो रोबोटिक्स इंडस्ट्री मध्ये एक रिसर्च सिइंटिस्ट म्हणून काम करतोय. अर्थातच पाश्चात्य देशात, पैशासाठी नाही, पण तो हरहुन्नरी आहे.
जे आवडतं ते करावं अश्या विचाराचा विजय, तसाच त्याचा मुलगा स्वरूप. विजय खूप मेहनती होता, आजही आहे, करण तो आजही थांबला नाही, पैसे गर्जेइतके असायचेच.
स्वरूप ही तसाच, विजय सारखा.
आज स्वरूपही बंगाई झुल्यावर बरोबर असता.
पण.. हा दुरावा…
विजय आणि स्वरूप ने हा दुरावा कधीच स्वीकारला होता,
पण प्रियेसाठी फार कठीण होते.

असो, आज ती वेळ आली जिची विजय आणि प्रिया दोघे आतुरतेने वाटही पाहत होते आणि प्रयत्नही करत होते

मराठी मराठी कथा मराठी कल्पना विश्व मराठी काल्पनिक कथा मराठी गूढ कथा मराठी प्रेम मराठी प्रेम कथा मराठी भयकथा मराठी भावना विश्व मराठी भावुक कथा मराठी रहस्य कथा मराठी रोमांचक कथा मराठी विश्व

Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – भाग १

प्रिये बंगई वर बसली होती आणि तिथून विजय ला म्हणाली

अरे विजय… किती वेळ झाला अजून चहा उकळतोय कि नाही तुझा?

विजय (किचन मधून)

अरे हो हो.. किती घाई. जेव्हा मी घाई करत होतो तेव्हा कशी बोलायची? काही दम धीर आहे कि नाही तुझ्यात. चहा नीट उकळावा लागतो तेव्हाच माझ्या विजयला आवडतो आणि तो फ्रेश होऊन जोरात कामाला लागतो.
तेव्हाही काम करत होतो आजही काम करतोय. आता तर अजून काम वाढलंय.

प्रिये

ए चिडचिड्या, मी नव्हतं सांगितलं तुला, तू स्वतःहून बोलला मी करतो आपल्यासाठी चहा

विजय चहाचे दोन कप घेऊन बाहेर आला आणि हसत म्हणाला

हा हा हा हा… अगं. हो हो, गम्मत करतोय मी. आज पर्यंत तू सुखी राहावीस म्हणून प्रयत्न केलेत मी. आणि यापुढेही करत राहीन. फक्त थोडी जाणीव करून द्यायची होती, कि वेळ लागल्यावर धीर धरायला कोणी सांगितलं कि काय वाटत. हा हा हा हा.

प्रिये कुत्सिकपणे हसत

हे हे. छान हो. कळलं मला.

ए जाऊदे ना विजय. ये लवकर, बस माझ्या बाजूला.
बघ ना किती सुंदर दिसतंय सगळं, कित्ती छान वाटतंय.

चहा चा एक घोट घेत प्रिया बोलली, तोवर विजय तिच्या बाजूला बसला.
प्रियेने हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.

बघ ना विजय, किती सुंदर आहे सगळं.
सूर्य अगदी डोळ्यासमोर. अगदी ताजी ताजी किरणं अंगावर येतायेत. संथ लाटा येतायेत किनाऱ्यावर, वाराही गार आहे. खुश शुद्ध वातावरण आहे. इतका ऑक्सिजन कधी आयुष्यात घेतला नाही आपण. इतकी मोकळी हवा कधीच नशिबात नव्हती आपल्या. मनावर कसलाच ताण नाहीये.
खरं सांगू? ऊर्जा सळसळते आहे निसर्ग आणि माझ्यात काहीच भेद वाटत नाहीये. सूर्याची सोनेरी किरण, सोनेरी किनारा, आकाशातली नारंगी छटा.
एखादा सिनेमा पाहणं आणि सत्यात पाहणं, खूप फरक आहे नाही?

विजय शांतपणे ऐकत होता त्याचे डोळे थोडे पाणावले होते

हो. खरं बोलतेस तू.

प्रियेचं लक्ष गेलं आणि बोलली

अरे विजय, काय झालं रे? इतकं छान वाटतंय सांगतेय मी आणि रडतोस काय?

विजय

ए.. मी काही रडत नाहीये, थोडं पाणी आलं.
बरं ते जाऊदे, तू सांग मला.
तुला आवडलं ना हे सगळं?

विजयला खरं तर त्याच्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. आजवर प्रियेने त्याच्या आयुष्यात त्याला जी साथ दिली होती, त्याच्या बरोबर उभी होती, सर्व गोष्टींचा सामना करत होती, त्याच्यावर विश्वास ठेऊन होती, त्याला जे प्रेम तिच्याकडून मिळालं, त्या सर्वा-सर्वांचं मिळून तिला काहीतरी खूप छान त्याला द्यायचं होतं. आणि ते दिल्यावर तिला आवडलं, ह्यापेक्षा गोंडस दिवस काय असावा आयष्यात?

प्रिये लाडात त्याला बोलली

विजय तुला एक सांगू?

विजय म्हणाला

बोल ना प्रिये.

प्रिये

तू माझ्याकडे असं एकटक पाहत राहिलास तर तुझ्या ऊर्जेने तो चहा पुन्हा गरम होणार नाहीये. तो गार होतोय, नंतर पिल्या जाणार नाही.

दोघेही खळाळून हसू लागले.

Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – भाग २

दोघांचा चहा पिऊन झाला होता. दोन्ही कप बंगईवर त्या दोघांबरोबर झुलत होते. दोघांपैकी कोणीही उठायला तयार नव्हते. कारण हे सुख सोडणं कोणालाच मंजूर नव्हतं. काही वेळ दोघेही फक्त वातावरणाचा अनुभव घेत होते.

प्रिये म्हणाली

आज माझ्या जागी इथे मिनी असती तर?

विजय

मिनी?

प्रिये

आता उगाच भोळेपणाचा आव आणु नकोस.
मी माझ्या डोळ्यांनी तिला फुले देताना पाहिलंय तुला.

विजय

ती? तुझी मैत्रीण मिनी? अगं काय हे? मी तेव्हाच सांगितलं होतं तुला, मी ते फुलं तुझ्यासाठी आणले होते. आणि आपल्या कॉलेज काळात इतकं सहज कोणी कोणाला फुलं देत नव्हतं. म्हणून तुझ्या मैत्रिणी कडून तुला द्यायचे होते. पण तिने काही ऐकलंच नाही माझं.

प्रिये हसत म्हणाली

हा हा हा हा. हो रे विजय, आपला काळ तसाच होता. पण खरं सांगते तेव्हा माझा खूप जळफळाट झाला होता. मला खरंच वाटलं कि तू तिला फुलं दिलेत. मी खूप रडले होते त्या दिवशी. आपल्या कॉलेज चा पहिलाच रोज डे आणि तू तिला फुलं दिली आणि तेही एकट्यात. मी तर पाहिलं होतं माझ्या डोळ्यांनी पण आणखी काही जणांनी पाहिलं आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली.

विजय थोडा चिंताग्रस्त होऊन

हो पण मला खरंच काही कल्पना नव्हती कि ती तुला ते फुलं कधीच देणार नाही, मला वाटलं ती आपल्या दोघांतली चांगली मैत्रीण म्हणून मदत करेन.

प्रिये मधेच थांबवून म्हणाली

हो. केली ना तिने मदत… स्वतःची.
माझी फुलं घेऊन गेली ती सटवी.

प्रिये रागाने लालबुंद झाली होती

विजय तिला शांत करत म्हणाला

प्रिये अगं.. मी त्यानंतर किती वेळा आणून दिलेत तुला फुलं..
आणि इतकी जुनी गोष्ट कुठे काढतेस तू? किती छान मूड होता तुझा.

प्रिये

तुला नाही कळणार रे विजय, ह्या मुलींच्या गोष्टी आहेत. ती पहिली वेळ होती. मी वाट पाहत होते, स्वप्न पाहत होते कि मला तू फुलं देशील, आणि तेच स्वप्न तिने चोरलं. तिने त्यानंतरही अफवांवर तुला वळवण्याचा प्रयत्न केला. तुला एक प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल करत होती ती.

विजय

हो. खरंय हे प्रिये. एक दबाव बनवत होती ती. मला अजिबात अपेक्षित नव्हतं हे सगळं आणि आवडतहि नव्हतं.

विजय प्रियेच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला

माझ्या मनात खरंच काही पाप नव्हतं. आणि झाल्या प्रकाराबद्दल मी तेव्हाही आणि आताही माफी मागतो.

प्रिये

अरे विजय, तू का माफी मागतोस. मी तुला तेव्हाच ओळखलं होतं कि तू खूप निर्भीड आणि खऱ्या मनाचा आहेस. तोच गुण पाहून मी तुला हो म्हटले होते.

लग्नासाठी…
हाहाहाहा..

विजय

अंग, हसतेस काय? मी आयुष्याचा साथीदार म्हणून तुझ्याकडे पाहत होतो. मग लग्नाचीच मागणी घालणार ना. आणि ते फिरून फिरून गेल्याने काय होतं पाहून झालं होतं, मिनीच्या प्रकरणात. मी तुला नेहमीसाठी हरवून बसतोय कि काय अशी भीती होती माझ्यात.

प्रिये हसत

हो रे. कळत होतं मला. खरं तर त्या एका वाक्याने माझ्यात विश्वास जागवला की तू खरा आहेस. आणि मी तुला हो म्हटले.

किती गोंडस पणे म्हटलं होतंस तू ..

माझ्याशी लग्न कर. माझ्या इतकं सुखात तुला कोणीच ठेऊ शकणार नाही, आज गरीब आहे पण हवं ते करेन तुला सुखी ठेवायला. एक दिवस आपण एक होऊ.

दोघांना हसू आवरेनासे झाले

जुन्या आठवणीत हरवून गेले होते.

विजय

किती निरागस होतो आपण.

Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – भाग ३

विजय शांत बसला होता. एकटक एका ठिकाणी दूरवर पाहत होता. त्याच्या मनात घालमेल चालू होती बहुतेक.

प्रिये

काय रे? आता विचार बदलतोस का? आता इथे नाहीये ती. ऑस्ट्रेलिया ला गेलीये, ते पण चौथं लग्न करून

विजय हसत

नाही गं.
मी बोललो होतो आपण एक दिवस एक होऊ.
खरंच झालो का?

विजय गंभीरपाणे विचार करत होता आणि विचारात होता

प्रिये त्याला धीर देऊन म्हणाली

एक कधीच काही नसतं विजय, जे आहे त्याचं अस्तित्व तसंच अबाधित असतं. आपण किंवा कोणीही अगदी परमात्माही आपल्याशी एकरूप होऊ शकतो, एक नाही. आणि हि एकरूपता किती काळ टिकावी हे दोघांवर अवलंबून असते

विजय त्यात होकार देऊन म्हणाला

हो खरं आहे. प्रिये मला वाटतं आपलं आयुष्य ना फार छोटे आहे. आपले अनेक जन्म आणि त्यांचा प्रवास म्हणजे जर नदी सारखा समजला तर आपण त्यात हळुवार तरंगणाऱ्या एखाद्या झाडाच्या पानाप्रमाणे असतो. दोन पानं एकत्र येतात, एका लयीत तरंगतात, त्यांचा प्रवास करत असतात. असं भासतं जणू ते दोन नाही एकच आहेत. त्यांचं पुढे कधी काय होतं काही कळत नाही.

प्रिये अचानक त्याला थांबवून म्हणाली

आणि तिसरं विजया नावाचं पान कधी येऊन भेटतं कळत नाही.

विजय बचकला

विजया नावाचं पान?

प्रिये हसत बोलली

अरे गम्मत करते तुझी. तू वाहवत चाललास.
ये जागेवर

थोडा वेळ दोघेही शांत होते.

प्रिये म्हणाली

खूप सुंदर होती आपली सुरवात. तुझ्या तुटपुंज्या पगावर आपण भाड्याच्या घरात राहत होतो, चाळीत. पण खूप सुंदर सुरवात होती. आपल्या दोघांच्या घरचे आंतरजातीय विवाहासाठी कधीच तयार होणार नाहीत हि कल्पना तर होतीच आपल्याला. मला लग्नाआधी ज्या किमती गोष्टींची गरज असायची त्याची उणीव कधीच जाणवली नाही मला, किंबहुना तूच ती जाणवू दिली नाही. मला खूप छान वाटत होतं. माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी तू हि तुझं ऐशोआरामचं आयुष्य सोडून अंगमेहनत घेत होतास माझ्यासाठी. कोणाचे इलेक्ट्रिक चे काम, अँटिना फिटिंग, वेल्डिंग जे पडेल ते काम केलंस. फक्त आणि फक्त माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी. जवळ जवळ तीन वर्षे असू आपण तिथे, हो ना?
स्वरूप दीड वर्षाचा होता तेव्हा सोडावं लागलं ते घर

विजय मधेच थांबवून बोलला

पण प्रगतीच झाली आपली, ते घर सोडलं म्हणून. नाही तर आज प्रिये रिसॉर्ट्सची इतकी मोठी चैन उभी नसती करता अली. माझ्या प्रिये ला ते सगळं देता आलं जिची तिला सवय होती.

प्रिये मंद हसली

हो. पण तरी खूप गोड आठवणी आहेत तिथल्या, त्या छोट्याश्या खोलीत आपण किती स्वप्न रंगवले, किती गप्पा केल्या. एकमेकांसाठी खूप वेळ होता आपल्याकडे. आणि हळूच स्वरूप येण्याची चाहूल लागली. एका आई साठी हि किती मोठी बातमी असते हे फक्त तिलाच कळतं. त्याच घरात स्वरूप चालू लागला. लुटूलुटू चालायचा पडायचा. खरं तर माझा आत्मा आजही तिथे असतो.

विजय मधेच थांबवून बोलला

आणि खोटे आरोपहि त्याच घरात लागले. त्या विजया नावाच्या पानाने आपली पानं दूर केलीच असती जर तुझा विश्वास नसता माझ्यावर तर.

प्रिये हसत बोलू लागली

मला खूप गम्मत वाटायची. मला तू कसा आहेस चांगलं ठाऊक होतं. त्यामुळे शंका घेण्याचा प्रश्नच नव्हता.
ती दर एक दिवसाआड फोन करून काहीतरी काम काढायची.
आहो ताई विजया बोलते विजय आहे का.

हाहाहाहा

आणि विजय जायचा लगेच विजया च्या मागे

विजय स्पष्टीकरण देऊ लागला

अगं, तेव्हा आपली परिस्थिती काय होती? गरज होती पैसे कमावण्याची. ती खोटं बोलते मलाही कळायचं पण तिच्यामुळे चार पैसेही मिळत होते. छोटंमोठं फूझ चं काम केलं कि पैसे सुटायचे.

प्रिये

आणि सगळे एकदाच वसूल केले तिने

विजय नाराजीच्या स्वरात

हो. उगाच खोटा चोरीचा आळ आणला माझ्यावर. म्हणजे सोन्याची चैन तिच्याकडेच होती मला दाखवून बोलते कि स्वरूप मला हवा आहे, तो दे तर तुझा आरोप मागे घेते, नाही तर पोलिसात देते. म्हटलं दे. परवडलं मला.
पण खरंच त्यावेळी तुझा माझ्यावरचा विश्वास आणि माझ्यासाठी केलेला त्याग ह्यामुळेच वाचलो मी. तू जर तुझ्या बाबांची आठवण असलेली चैन तिला दिली नसती तर कठीण होतं प्रकरण.

प्रिये

जाऊदे रे. तुझ्याइतकं महत्वाचं कोणी नाही माझ्या आयुष्यात. मला त्या बाईची नजर खूप आधीच कळून येत होती. तिचंही आयुष्य फार भेदरलेलं होतं. खूप काही हरवलं होतं त्या बाईने तिच्या आयुष्यात आणि तेही अचानक. अशा वाईट परिस्थितील लोकांची नजर लागते. तिचं असं वागणं मला काही आश्चर्यकारक वाटलं नाही. आणि हे सगळं फक्त एका सोन्याच्या चैन ने निभावणार असेन तर काय हरकत होती?

विजय

पण आज आता हे सगळं का आठवतंय तुला?

प्रिये

अरे भोळा रे भोळा. तू मला जाणीव करून दिली ना कि तू काम करतोयस. म्हणून मी पण माझ्या प्रेमाची जाणीव करून दिली.

हाहाहाहाहा

विजय

हाहाहाहाहा
बरं. चला ऊन लागतंय आता.
जेवायचं बघावं लागेन.

दोघेही उठून आत गेले

Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – भाग ४

दोघेही स्वयंपाकघरात आले. प्रिये एका ठिकाणी उभी राहून स्वयंपाक करत होती, आणि विजय तिला जे जे काही हवं ते तिच्या जवळ आणून देत होता.
स्वयंपाक करता करता दोघेही अंताक्षरी खेळू लागले.

विजय

तुझ्या डोळ्यांत माझं मन दिसतंय,
माझ्या डोळ्यांत तुझं मन हसतंय,
थोडं हास्यामधुन थोडं स्पर्शामधुन,
शब्दावाचुन सारं उमगतंय

प्रिये

येशील ना
आठव तुझी, दाटे मनी
हूरहूर ती, हृदयातही
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी..
स्मरते मला अजुनि,

भेट आपुली,
भेट कोवळी ती,
पावसातली…

अंग अंग चिंब ओले,
जीव धुंदले,
धडधड उरात दोन्ही,
श्वास रोखुनि..

तू श्वास रे, होऊन जिवा
येशील ना, माझ्या उरी
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी

विजय

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना, बनात ये ना जवळ घे ना, चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत ये ना, प्रीतीत ये ना जवळ घे ना

प्रिये

आ !!!!!

विजय

सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला….

प्रिये विजयच्या खांद्यावर चापटा मारत म्हणाली

चांगलं कळतंय मला तुझ्या मनात काय आहे ते

दोघेही त्यांच्या बागेतल्या श्याक वर सगळं जेवण घेऊन आले. विजय ने आणि प्रिये ने जे स्वप्न पाहिले होते तसे छानसे श्याक मध्ये डायनिंग आणि चार खुर्च्या होत्या

प्रिये

अरे विजय, दोन खुर्च्या बस झाल्या असत्या आपल्या दोघांना

विजय

असू देत म्हटलं गरज लागलीच तर

प्रिये

म्हणजे तू इतकं जाड व्हायचं ठरवलंय की तुला एकट्याला दोन खुर्च्या लागतील?

विजय रागाने प्रिये कडे पाहू लागला

प्रिये

हाहाहाहा, अरे गम्मत करते रे मी, किती गोड लुक देतोस. अगदी कॉलेज चा विजय दिसतोय.

असं म्हणत प्रिये ने एक फ्लाईग किस दिला, आणि विजय एखाद्या नववधू सारखा लाजेने गुलाबी झाला.

विजय ने प्रिये ला बसण्यासाठी खुर्ची मागे घेतली

सांभाळून, स्क्रू एकदम ढिला केलास तर आदळशीन खुर्चीवर.

प्रिये

आता सवय झाली रे मला, आणि तू असताना कसली काळजी रे?

जवळ जवळ सात वर्षांपूर्वी अपघातात प्रियेचा एक पाय गेला आणि तिला कृत्रिम पाय लावावा लागला, तेव्हापासून विजय तिच्या प्रत्येक हालचालीत तिच्याबरोबर असतो

किती छान वाटतंय रे विजय. आपलं आख्ख आयुष्य मुंबईच्या बंदिस्त घरात गेलं. आणि आज आपण इतके मोकळे आहोत. इतक्या हवेशीर ठिकाणी जेवणाची चव अजून वाढलीये, भूक पण सपाटून लागलीये.

काय रे विजय, तू पण बोल काही, तुला काहीच वाटत नाही वेगळा?

विजय

तू अगदी तेच बोलतेस जे माझ्या मनात आहे. मी तुला आनंदात पाहूनच खुश आहे

प्रिये

हो,

हा आनंद द्विगुणित झाला असता.

प्रिये शांत झाली आणि थोडी गंभीर, थोडी दुःखी.

विजय

काय गं, काय झालं?

एकदम का गप्प झालीस, सांग कशाने आनंद द्विगुणित झाला असता?

प्रिये

नको राहूदे, नाही पटणार तुला

विजय

अगं, एकदा बोलून तर पहा

थोडा वेळ दोघेही शांत होते

प्रिये

जर ह्या दोन रिकाम्या खुर्च्यांवर स्वरूप आणि आपली होणारी सून बसली असती तर?

प्रियेचे डोळे पाणावले, ती एकटक शून्यात पाहत होती. तिच्या हातात असलेला घसही ती खायचा विसरली होती.

विजय उठला आणि त्याने प्रियेचं डोकं घट्ट त्याच्या छातीवर धरलं. प्रिये थोडी लाजली आणि मंद हसू लागली

विजय

प्रिये, आपण दोघांनी विचार करूनच त्याला जाऊ दिलं ना? त्याला त्याचं मोकळं उडू देऊ म्हटलो होतो, तो खरंच काहीतरी आहे, त्याला स्वतःची ओळख बनवू देऊ. आता कुठे त्याला त्याच्या कामासाठी पारितोषिक, प्रसिद्धी मिळू लागली आहे, आपण खुश असलं पाहिजे त्याच्या प्रगतीने.

प्रिये

तुला नाही कळणार रे आईचं मन

विजय

बरं, चल आवरून घेऊ आणि अराम करू