Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ३

तिच्या सर्वांगावर शहरे आले होते. हा तोच आवाज आहे का ज्याची ती अगदी आतुरतेने वाट पाहात होती? पुढचे अनेक प्रश्न तिच्या मनात येण्या आधीच ती मागे वळली..

तिचे डोळे स्थब्द झाले.

पुन्हा आवाज आला

ए राणी, अशी उदास नको होऊस ना. जशी आहेस तशीच राहा ना. खूप सुंदर आहेस तू…

सरिता आता हळू हळू शुद्ध हरपू लागली, तितक्यात त्याने तिला सावरलं.

ती त्याच्याकडे पाहत होती, हळू हळू तिचे डोळे पाणावले, ती खूप निरखून त्याला पाहत होती. तिच्या नजरेत अपार प्रेम होते, खूप प्रश्न होते, तक्रारी होत्या.

तिने घट्ट मिठी मारली आणि ओक्साबोक्सि रडू लागली.
सरिता

इतकी परीक्षा घेता का कोणी?

किती वाट पहिली मी तुझी, वेडी झालीये मी तुझ्यासाठी, तुला माहिती आहे मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी रोज सजून होते, तुझ्या चेहऱ्याची वाट पाहत, तुझ्या आवाजाची वाट पाहत, तुझ्या सहवासाची स्वप्न पाहत. तुला काहीच काळजी वाटली नाही का? सांग ना.. का इतका उशीर केलास यायला? तुझ्यात हरवून जायचंय मला. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…

त्याने तिच्या डोक्यावरून पाटीवर हाथ फिरवला आणि बोलला

शांत हो गं माझी राणी, मी हि खूप प्रेम करतो तुझ्यावर, म्हणून तर इतक्या दुरून आलो. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी

सरिताने मिठी सोडली आणि थोड्या दुरून त्याला मन भरून पाहत होती. तिच्या आसवांचा अडसर तिने दूर केला आणि पुन्हा त्याच्याकडे पाहत राहिली.

चार ते पाच तास उलटले. ती कामावर जायचे विसरली होती. त्याने तिला हळूच जवळ केले आणि बोलला

उपाशीच ठेवणार आहेस का तुझ्या राजाला?

ती हळूच हसली आणि स्वयंपाक घरात गेली, तिने भरभर जेवण बनवले आणि त्याला स्वतःच्या हाताने भरवत होती, अधून मधून तोही तिला भरवत होता. दोघांमध्ये काही संवाद होत नव्हता, दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत होते. सरिताच्या डोळ्यातून मधूनच अश्रू गळत होते, आणि तो ते टिपून घेत होता.

आता सरिता त्याच्या मांडीवर डोके ठेऊन झोपली, आताही त्यांच्यात संवाद नव्हता, तो हळू हळू तिच्या केसांतून हात फिरवत होता. सरिताला हि स्वर्गानुभूती वाटू लागली, तिचा डोळा कधी लागला काहीच कळले नाही.

रात्री एक वाजता जाग आली, तो तिथे नव्हता. ती झटकन उठली आणि त्याला शोधू लागली. सगळ्या खोल्यांमध्ये तिने पहिले ती एकदा, दोनदा, अनेकदा पाहू लागली, सैरावैरा धावू लागली, तिला चैन पडत नव्हते, ती पुन्हा पुन्हा शोधत होती. अचानक नजर दरवाज्यावर गेली तर दार उघडे दिसले, मग तिला अन्दाज आला कि तो गेला.

ती पुन्हा उदास झाली आणि लिविंग रूम मधेच बसून राहिली. गुडघ्यांवर हात आणि डोके ठेऊन विचार करू लागली, रडू लागली. ती एकटीच बडबडत होती.

काय चुकले रे मी राजा? मी जेवण तर चांगलं केला होता ना, तुला काही चुकून बोलले का मी? मी रडल्यामुळे चांगली नव्हते दिसत रे, परत ये ना.

सरिता हरवली होती, तिला सहन होत नव्हते. तिचे मन काहीही अंदाज काढू लागले. ती पुन्हा खिन्न झाली होती.

Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ४

सकाळ झाली पण सरिता तिथेच बसून होती, अजून रडत होती. उदास बसली होती.

पुन्हा तोच आवाज आला आणि खांद्याला स्पर्श झाला

ए राणी, अशी उदास नाही चांगली वाटत तू .. तुला आवडत नाही का मी? मी आल्यावर तर खुश राहा.

सरिता ने पुन्हा त्याला घट्ट मिठी मारली. आता ती त्याला सोडायला तयार नव्हती. एकाच प्रश्न

कुठे गेला होतास तू मला सोडून?

ए राणी, इतकं कसं प्रेम करतेस गं माझ्यावर?

मी तुझाच आहे, कुठे नाही जात तुला सोडून. चल लवकर तयार हो आणि जा कामावर

सरिता आता शांत झाली आणि कामावर गेली. आता तिला फार हायसं वाटत होतं. तिला जे हवं ते मिळालं होतं. सगळं कसं अलबेल चाललं होतं.

दिवसांमागुन रात्री उलटल्या…

ते दोघे रोज भेटू लागले, तिने पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण झालं होतं, सत्यात उतरलं होतं. दोघांमध्ये कोणीही तिसरा व्यक्ती नव्हता. फक्त दोघेच. त्यांच्या वेगळ्या विश्वात. इतक्या दिवसात कधीच त्यांनी एकमेकांचा भूतकाळ जाणून घेतला नाही. भविष्य देखील त्यांनी असली धर्तीवर रंगवले नव्हते. सगळं स्वप्नासारखं सुंदर. हो हेच तर हवं होतं सरिताला.

त्याच्या सोबत प्रत्येक क्षण ती जगत होती, अनुभवत होती. त्यांच्यातली जवळीक वाढली. त्यांना मर्यादाही उरल्या नव्हत्या. ते दोघे ज्या विश्वात होते त्याला वास्तवाचं भान अजिबात नव्हतं.

सरिता च्या नाराजीवर नेहमी एक उत्तर असायचं त्याच्याकडे

सगळं नीट होईन. तुझ्या मनासारखं होईन. माझं वचन आहे

कधी बॉस शी पटत नव्हते तर बॉस ची जागाच तिला मिळाली, पैसे भरभरून आले, पदोन्नती, आर्थिक सुबत्ता, वाढत अहंम. तिचे ज्याने मन दुखावले त्याची अवस्था बिकट होत असे, तो माफी मागायला येत असे. तिला कोणीही उलट बोलत नसे. कोणताही सवाल केलेला तिला चालत नव्हता. ती जिथे जात असे तिथे लोकं तिच्या दिमतीत हाज़िर होत असे. बरेच लोक तिला न ओळखतानाही घाबरू लागले होते.

पण हळूहळू तिचे लोकं तिच्यापासून दूर होऊ लागले. अर्थातच सरिताला काही वाईट वाटत नव्हते ह्या गोष्टीचे.

अनेक महिने उलटले आणि तो बोलला

आपण लग्न करूयात?

हो ….

सरिता खूप खुश झाली. तिचे सगळे स्वप्न प्रत्यक्षात उतरली होती

Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ५

अखेरीस सरिताचं स्वप्न पूर्ण झालं. तिला सुंदर नवरा मिळाला. तिला जगाला ओरडून सांगायचं होतं

सरिता

आई, मी माझं स्वप्न पूर्ण केलं. मला भेटला माझा सुंदर नवरा

आई तशी बोलण्याच्या स्थितीत नव्हती

वा!!! छान बाळा, ओळख करून दे, त्याच्या आई बाबांशी सगळी बोलणी करू आपण. काय नाव आहे त्याचं

सरिता

नाव?

काही माहिती नाही

म्हणजे? माहिती नाही कसं? लग्न कोणाशी करतेस?

अरे हो. राजा मी त्याला राजाच बोलते

आणि आडनाव? आपल्या जातीत आहे का? काय करतो? किती कमावतो, घरचे कसे आहेत?

ह्या सगळ्या प्रश्नांचा सरिताने कधी विचारच केला नव्हता

अचानक प्रश्नांच्या भडिमाराने तिने काही उत्तर ना देता फोने ठेऊन दिला. तिला विचार करायचाच नव्हता

तिथे आईला भोवळ आली कारण तिला काळाला होता कि सरिता ने काहीतरी मोठा गोंधळ केला आहे. आणि त्यांचं नाक कापलं आहे

सरिता फार घाईत होती, तिला खूप कामं होती, बरीच खरेदी करायची होती, पार्लर मध्ये जायचं होतं. लग्न कुठे कसं होणार काहीच कल्पना नव्हती. फक्त एक गोष्ट माहिती होती, ती म्हणजे लग्नाची वेळ.

आज

सरिता सगळी कामं घाईत आटपून घरी आली

पण घरी वातावरण काही वेगळच होतं. सगळीकडे धूर, हा धूप अगरबत्तीचा होता, पण हे इस्लामी धूप होते, इत्तराचा वास, एक वेगळीच रोषणाई, भिंतींना मखमली चादरी, खूप सारी फुले, एक वेगळीच सजावट

आणि

मौलवी?

अगं राणी, हैराण काय होतेस. मी तुला सांगितलं नव्हतं मी दुबईत काम करतो.

आता सरिता तिचे मन बदलण्याच्या स्थितीत अजिबात नव्हती. तो जे म्हणेल ते तिला ऐकायचं होतं. तो सांगेन ती पूर्व दिशा होती. तिने आणलेला शालू बाजूला ठेवला आणि त्याने सांगितलेले कपडे तिने घातले. त्यांचा विवाह निकाह झाला. तिने कपडे बदलण्यापासून तिच्या ताब्यात काहीच नव्हते. काय घडतंय हे काहीच कळत नव्हतं, खरं तर ती ह्या सर्व गोष्टींची साक्षीही नव्हती. एखाद्या अर्धवट स्वप्नाप्रमाणे सर्व आजूबाजूला जाणवत होतं.

एक विचित्र वेळ होती हि, सर्वच बदलून गेलं.
हाच का तो क्षण ज्याची ती इतक्या आतुरतेने वाट पाहत होती?

Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ६

सरीताला जरा उशिराच जाग आली, ती हि दरवाजा कोणी वाजवला म्हणून. तीची शक्ती पूर्णतः जीर्ण झाली होती. ती कशीबशी उठली आणि दरवाजा उघडला. तोच मुलगा जो तिला आधी बालकनीतून पाहायचा, समोरच्या इमारतीतला.

तो म्हटला

मी विशाल, पोलीस चौकीत आहे मी नाक्यावरच्या. बरेच दिवसाचा लक्ष ठेऊन आहे.

आम्ही तसे तक्रारी शिवाय कधी कोणत्या दरवाज्यावर जात नाही, पण गडबड वाटली

सरिता त्याला मधेच थांबवून बोलली

गडबड? नाही तसं काही नाही. आणि मी अशीही दुबई ला चालले, कालच लग्न झाला माझं.

विशाल

काय? काल?

बरं ठीक आहे, हे कार्ड ठेवा आणि गरज लागली तर लगेच फोन करा

विशाल निघून गेला

सरिताने दार लावलं, आणि तिने घराकडे नजर फिरवली.

ती घाबरली, ह्याच घरात तीच कालच लग्न झालं, आणि इतकं साफ कसं?

तितक्यात तो आला

अगं राणी, घाबरतेस काय?

आणि हे काय तुझ्या हातात?

सरिता

अरे काही नाही, पोलीस राहतात समोरच्या इमारतीत ते आले होते. काहीतरी गैरसमज झाला असणार त्यांचा

तो अचानक संतापला.

हिम्मत कशी केलीस तू दुसऱ्या पुरुषाला भेटण्याची?

सरिता

अरे पण तो आला होता घरी

तो

मी सोडून कोणताही दुसरा पुरुष तुझ्या आयुष्यात नसेन, कोणत्याच पुरुषाशी बोलायचं नाही तू , फक्त मी, मी आणि मीच असणार

तो संतापाने लालबुंद झाला होता, थरथरत होता

सरिता घाबरली आणि बोलली

अरे राजा लग्न झालाय आपलं, आता मी फक्त तुझीच असणार. पण कामावर तर दुसऱ्या पुरुषांशी बोलावच लागतं

तो आणखी संतापला आणि त्याने पैशाने भरलेली सुटकेस तिच्या समोर रिकामी केली

किती पैसे हवेत तुला? दहा वर्षात जितके कमावशीन तितके आहेत हे. पण आजपासून तू बाहेर जायचं नाही. कामावर कळव कि तू दुबईला चाललीस.

हि दारं खिडक्या बंद ठेव, इथे फक्त तू आणि मीच असणार

सरिताला काय करावे कळत नव्हते, खरं तर तो इतका सुंदर होता कि तिने त्याला ताब्यात ठेवायला हवे होते. सगळ्या मुलींपासून दूर. पण आज तो तिच्यासाठी इतका वेडा झालाय.

तू जे सांगशीन ते सगळं ऐकेन रे राजा. तू जे बोलशीन ते. इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर? आज आता जर तू माझा जीव मागितला तर ओवाळून टाकेन तुझ्यावर.

तो भावुक झाला

मला जीव नकोय गं राणी तुझा. तू फक्त माझ्याशी बोलत राहा, इथेच बस. अशीच खुश राहा माझ्याशी बोलताना.

सृष्टीचा अंत झाला तरी चालेन पण मी इथून हलणार नाही. पर्वा नाही मला कसलीच. तू माझी आहेस, फक्त आणि फक्त माझीच.

Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ७

आज एक वर्ष झालं दोघांच्या लग्नाला

सरिताच्या आईला फोन आला

नमस्कार मावशी, मी विशाल देशपांडे बोलतोय. ओळखलंत का?

अरे बाळा कसा आहेस? माफ करा रे, सरिता खूपच वाया गेली, इतके लाड केले आम्ही, तिला भानच राहत नाही आपण कोणाचा अपमान करतोय ते

अहो मावशी, जाऊद्या ते आता, झाला गेलं विसरू.

आता सध्या विषय गंभीर आहे, चिंता करू नका. मी सर्व पाहून घेतो, पण तुम्ही दोघे मुंबई ला यायला निघा. गरज आहे सरिता ला तुमची.

सरिताचे आई वडील दोघेही निघाले ते थेट मीरा रोड नाक्यावरच्या पोलीस चौकीत पोचले. विशाल त्यांना घेऊन इस्पितळात आला.

सरिता ज्या वॉर्ड मध्ये आहे तिथे तो घेऊन गेला. सरिता बेड वर होती. शांत झोपलेली. तिला झोपेचे इंजेकशन द्यावे लागले होते. तिचा अवस्था फारच वाईट होती. शरीर पूर्ण जीर्ण झाले होते, फक्त हाडं दिसत होती. गालावरही मास उरलेले नव्हते.

डॉक्टर आले आणि सांगू लागले.

पेशंट फारच गंभीर मानसिक अवस्थेत आहे, जितकी शाररिक अवस्था दिसते त्यापेक्षा गंभीर तिची मानसिक अवस्था आहे. गेल्या एका वर्षांपासून पेशंट ने काहीच खाल्लेले नाही. फक्त प्रोटीन डाएट आढळून येतोय, बहुदा मास खाल्लंय आणि तेही साधारण नाही, कदाचित किडे, मच्छर, मुंग्या, झुरळ ह्यांच सेवन असावं. पेशंट बरं होणं दुर्मिळ गोष्टीसारखं आहे.

असे बोलून डॉक्टर चालले गेले.

आई वडील दोघेही काळजीत पडले, रडू लागले. तितक्यात विशाल त्यांना म्हणाला

हे सगळं नीट होईन काळजी करू नका. माझ्या ओळखीत एक तांत्रिक आहे. आता हे काम तेच करू शकतात

सगळे सरिताला घेऊन गाडीने तांत्रिक कडे पोचले

विशाल ने माहिती द्यायला सुरवात केली, विशाल म्हणजे हा तोच सावळा देखणा मुलगा जो सरिताला लग्नाची मागणी घालायला आला होता आणि अपमान पदरी घेऊन गेला. आणि तोच तिच्यावर समोरच्या इमारतीतून लक्ष ठेऊन होता.

मी जेव्हा सरिताला तिच्या घरातून बाहेर काढलं तेव्हा दरवाजा फोडून आम्हाला जावे लागले. जेव्हा दार तोडलं तेव्हा सरिता विवस्त्र अवस्थेत भिंतीकडे तोंड करून बसली होती, हसत होती, काहीतरी पुटपुटत होती. तिचे शरीर हे जीर्ण होते. तिला उठवणं खूप ताकतीचं काम होतं. माझा अंदाज आहे कि काही तरी वाईट शक्ती आहे, त्याशिवाय अशा अवस्थेत कोणी कशी टाकत लावू शकेन?

मी आधी पासून सरितावर लक्ष ठेऊन होतो, कारण तिला ज्या दलालाने फ्लॅट दाखवला आणि तिचा पोलीस वेरिफिकेशन सर्टिफिकेट घेतलं तेव्हा त्यानेच अंदाज दिला कि काही तरी गडबड वाटते.

मी बऱ्याच वेळा तिला खिडकीतून बाल्कनीतून डोकावताना पाहिलं. कोणाला तरी सतत शोधात होती ती. पुढे तिच्या सवयी अजून विचित्र झाल्या, ती बाल्कनीत एकटीच गप्पा मारत चहा पीत असे. कधी खुर्चीवर डोकं ठेऊन रडत असे, कधी हसत असे, कधी खुर्चीवर हात फिरवत असे. कधी घरात एकटीच धावताना आढळली.

मी एकदा घरी गेलो, अंदाजे एका वर्षापूर्वी, तर ती बोलली तिचे लग्न झाले आणि दुबईला जाणार आहे. मग मीही प्रकरणातून लक्ष काढून घेतले.

मग एकदिवस दलालाच फोन करून बोलला कि भाडं द्याची बंद झाली हि मुलगी. मग मी तपास चालू केला. तिच्या इमारतीत राहणारे अनेकांना वेगवेगळे अनुभव आले. तिच्या खालच्या माळ्यावर राहणाऱ्यांची तक्रार होती कि सतत पाळण्याचा आवाज येतोय ते हि रात्री बेरात्री. शेजारच्यांनी भिंतीवर डोकं आपटल्याचा आवाज आल्याचे सांगितले, तर कधी कधी कण्हण्याचा आवाज येत असे. सगळे घाबरून गप्प होते. कारण घराला बाहेरून कुलूप होते.

Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ८

तांत्रिक शांतपणे ऐकत होता, आणि मग तो सरिताच्या अंगावर राख फेकून विचारू लागला

फक्त खरं तेच बोलायचं पोरी.

सांग कोण होता तो?

त्याला मी राजा म्हणायचे. त्याचा खरं नाव मला नाही माहिती

तुला पहिल्यांदा कसा भेटला?

तो अचानक आला घरी, माझ्या खांद्यावर हाथ ठेऊन प्रेमाने राणी बोलला मला तो

तू ओळखत होतीस त्याला? पत्ता दिला होता? घराचं दार उघड ठेवत होतीस?

नाही मी त्याला ओळखत नव्हते, पण मी स्वप्नात पाहिलं होतं त्याला. खूप सुंदर होता तो. पण.. मी दार तर कधीच उघड ठेवत नव्हते घराचं, मग तो आत कसा आला?

आता ट्यूब पेटते पोरीची. काय करायचा पोरगा? कुठे राहायचा? आडनाव काय?

हेच प्रश्न आईने विचारले होते, पण मी दुर्लक्ष केलं

सरिताला आता अंदाज आला कि ती खूप मोठ्या भ्रमात होती आणि ती फसली आहे. पण तिला तो स्पर्श स्पष्ट आठवत होता, तो नकली नव्हता. ती तांत्रिकाला विचारू लागली

पण तो खोटा कसा असू शकतो? मी अनुभव केलाय प्रत्येक क्षण ..

तांत्रिकाने मधेच थांबवले आणि बोलू लागला

काही सांगायची गरज नाही मला, सगळं स्पष्ट दिसतंय मला.

भुरळ पाडली त्याने तुला. माणूस नव्हता तो.

एक जिन्न होता जिन्न.

एकदम घाणेरडा आहे दिसायला, त्याने तुझ्या मनातली प्रतिमा तुझ्या डोळ्यासमोर ठेवली आणि त्यामागे तो दडून होता. त्याने त्याच विश्व कधीच सोडलं नाही, तो तुला तिथे खेचून घेऊन गेला. तुझे सगळे अनुभव खरे होते. तू वेडी नव्हती, पण ह्या जगात त्या जगाचा थांगपत्ता लागत नाही. तुला सिद्ध करता येणार नाही. त्याला काहीच मेहनत घ्यावी लागली नाही तुला फसवायला कारण तू सुंदरतेची लालची आहेस. रोज तुझ्या शरीरातील महत्वाच्या ग्रंथी, तुझे जीवनसत्व, तुझे रक्त चोरून नेत होता तो. त्याची शक्ती तो त्याच्या मालकाचे हुकूम पूर्ण करायला वापरात होता. तुला फक्त झुरळ मुंग्यांवर जिवंत ठेवला त्याने. त्याने दिलेल्या बॅग भर पैशाचं काय केलं? कधी दिसले तुला नंतर? तुझे पूर्ण शोषण झाले आहे आणि मला हेही ठाऊक आहे कि तुझं अंतर्मन आजही त्याच्या प्रेमाची वाट पाहतंय

सरिता पायाशी पडून रडू लागली.

मी काय करू? मी काय करू?

हरले मी. सगळं संपलं. माझं आयुष्य गेलं, उद्दिष्ट गेलं, मला मारून टाका

नाही बाळ, असं हारून नाही चालत. अगं सुंदरता काही रूपात नाही मनात शोधावी, एकदा प्रेम करून बघ, तुझ्या कर्माचे फळ वाईट आहे, पण मी बदलेन हि सृष्टी आणि तिचे नियम, तुझं मन स्वच्छ आहे. मी देतो तुला वरदान, तुझ्यावर प्रेम करणारा मुलगा येईन. प्रत्येक लढाईत मी देवासारखा तुझ्या पाठीशी असेन. संकट अजून गेलेला नाही. पण मी सतत तुझं रक्षण कारेन.

विशाल बोलला

सरिता, मला आजही तू तितकीच आवडतेस, माझ्याशी लग्न कर, मी सुखात ठेवेन.

सरिता लाजली, तिच्या कल्पनेपलीकडे कोणी चांगला व्यक्ती तिने पहिला होता आज. तिचे डोळेही उघडले होते.

तांत्रिक खुश झाला आणि त्याने विशाल ला एक काळा धागा मनगटावर बांधला

निर्धास्त होऊन पुढे जा… मी आहे तुमच्या पाठीशी….

Categories
संकीर्ण

महाराष्ट्र गीत

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा…

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …

भीती न आम्हा तुझी मुळी ही
गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा….

महाराष्ट्र गीत, महाराष्ट्र, गीत, शाहीर साबळे