Categories
कथा सुंदर नवरा

सुंदर नवरा – भाग ८

तांत्रिक शांतपणे ऐकत होता, आणि मग तो सरिताच्या अंगावर राख फेकून विचारू लागला

फक्त खरं तेच बोलायचं पोरी.

सांग कोण होता तो?

त्याला मी राजा म्हणायचे. त्याचा खरं नाव मला नाही माहिती

तुला पहिल्यांदा कसा भेटला?

तो अचानक आला घरी, माझ्या खांद्यावर हाथ ठेऊन प्रेमाने राणी बोलला मला तो

तू ओळखत होतीस त्याला? पत्ता दिला होता? घराचं दार उघड ठेवत होतीस?

नाही मी त्याला ओळखत नव्हते, पण मी स्वप्नात पाहिलं होतं त्याला. खूप सुंदर होता तो. पण.. मी दार तर कधीच उघड ठेवत नव्हते घराचं, मग तो आत कसा आला?

आता ट्यूब पेटते पोरीची. काय करायचा पोरगा? कुठे राहायचा? आडनाव काय?

हेच प्रश्न आईने विचारले होते, पण मी दुर्लक्ष केलं

सरिताला आता अंदाज आला कि ती खूप मोठ्या भ्रमात होती आणि ती फसली आहे. पण तिला तो स्पर्श स्पष्ट आठवत होता, तो नकली नव्हता. ती तांत्रिकाला विचारू लागली

पण तो खोटा कसा असू शकतो? मी अनुभव केलाय प्रत्येक क्षण ..

तांत्रिकाने मधेच थांबवले आणि बोलू लागला

काही सांगायची गरज नाही मला, सगळं स्पष्ट दिसतंय मला.

भुरळ पाडली त्याने तुला. माणूस नव्हता तो.

एक जिन्न होता जिन्न.

एकदम घाणेरडा आहे दिसायला, त्याने तुझ्या मनातली प्रतिमा तुझ्या डोळ्यासमोर ठेवली आणि त्यामागे तो दडून होता. त्याने त्याच विश्व कधीच सोडलं नाही, तो तुला तिथे खेचून घेऊन गेला. तुझे सगळे अनुभव खरे होते. तू वेडी नव्हती, पण ह्या जगात त्या जगाचा थांगपत्ता लागत नाही. तुला सिद्ध करता येणार नाही. त्याला काहीच मेहनत घ्यावी लागली नाही तुला फसवायला कारण तू सुंदरतेची लालची आहेस. रोज तुझ्या शरीरातील महत्वाच्या ग्रंथी, तुझे जीवनसत्व, तुझे रक्त चोरून नेत होता तो. त्याची शक्ती तो त्याच्या मालकाचे हुकूम पूर्ण करायला वापरात होता. तुला फक्त झुरळ मुंग्यांवर जिवंत ठेवला त्याने. त्याने दिलेल्या बॅग भर पैशाचं काय केलं? कधी दिसले तुला नंतर? तुझे पूर्ण शोषण झाले आहे आणि मला हेही ठाऊक आहे कि तुझं अंतर्मन आजही त्याच्या प्रेमाची वाट पाहतंय

सरिता पायाशी पडून रडू लागली.

मी काय करू? मी काय करू?

हरले मी. सगळं संपलं. माझं आयुष्य गेलं, उद्दिष्ट गेलं, मला मारून टाका

नाही बाळ, असं हारून नाही चालत. अगं सुंदरता काही रूपात नाही मनात शोधावी, एकदा प्रेम करून बघ, तुझ्या कर्माचे फळ वाईट आहे, पण मी बदलेन हि सृष्टी आणि तिचे नियम, तुझं मन स्वच्छ आहे. मी देतो तुला वरदान, तुझ्यावर प्रेम करणारा मुलगा येईन. प्रत्येक लढाईत मी देवासारखा तुझ्या पाठीशी असेन. संकट अजून गेलेला नाही. पण मी सतत तुझं रक्षण कारेन.

विशाल बोलला

सरिता, मला आजही तू तितकीच आवडतेस, माझ्याशी लग्न कर, मी सुखात ठेवेन.

सरिता लाजली, तिच्या कल्पनेपलीकडे कोणी चांगला व्यक्ती तिने पहिला होता आज. तिचे डोळेही उघडले होते.

तांत्रिक खुश झाला आणि त्याने विशाल ला एक काळा धागा मनगटावर बांधला

निर्धास्त होऊन पुढे जा… मी आहे तुमच्या पाठीशी….